योगेश मगर यांचा वाढदिवस उत्साहात; समाजकारण व सहकार क्षेत्रातील योगदानाला सलाम


अलिबाग शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. आपल्या कार्यतत्परतेमुळे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांनी अलिबाग परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजकारण आणि समाजकारण यांचा समतोल साधत त्यांनी अनेक वर्षे जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनाही बळकट झाली.
सहयोग पतसंस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी संस्थेची आर्थिक प्रगती साधत सभासदांचा विश्वास जपला आहे. पारदर्शक कारभार, नवनवीन उपक्रम आणि सर्वसमावेशक धोरणांमुळे पतसंस्थेला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच सचिव, रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग आणि काँग्रेस भवन ट्रस्ट, अलिबाग येथे खजिनदार म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
योगेश मगर हे केवळ राजकीय नेते नसून एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास साधण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आयुष्य आणि भविष्यातील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!