चिरतरुण आवाज हरपला : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन


मुंबई (प्रतिनिधी): ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या चिरतरुण आणि बहुआयामी आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी आज काळाच्या पडद्याआड प्रस्थान केले.
छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती पुत्र आनंद भोसले यांनी दिली. उद्या दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आशा भोसले यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, संगीतविश्व आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली असून, देशभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.