अलिबाग (प्रतिनिधी): पेढांबे येथे मा. सौ. चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या पुरस्करातून व सौ. अपर्णा अजिंक्य पाटील यांच्या आयोजनातून ‘पेढांबे पंचायत प्रिमियर लीग २०२६’ पर्व ३ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. स्थानिक तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेस रायगड जिल्हापरिषद नवनिर्वाचित सदस्य तसेच मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांनी विशेष उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या आगमनावेळी आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित मान-सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.
दादांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा देत क्रीडांगणातूनच व्यक्तिमत्व विकास साधता येतो, असे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमुळे गावातील क्रीडा वातावरणाला चालना मिळाली असून युवकांमध्ये एकजूट व क्रीडास्पर्धेची भावना वृद्धिंगत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





