अलिबाग (प्रतिनिधी): माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भावना ताई पाटील हेदेखील उपस्थित होत्या. सर्वांनी पंडितशेठ पाटील यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात अधिक यश लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान परिसरातील विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि आगामी योजनांवरही चर्चा करण्यात आली. पंडितशेठ पाटील यांनीही सर्वांचे आभार मानत, जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात विकासाच्या दृष्टीने अधिक समन्वय साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Home ताज्या बातम्या माजी आमदार पंडितशेठ पाटील यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट; प्रशांत नाईक व भावना...






