रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित अशोक नाईक यांची निवड


रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित अशोक नाईक यांची निवड झाली. हा सोहळा कैलास गोरे पाटील आणि आचार्य राहुलजी पिंपळे महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला.
संस्था २२ राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कांसाठी कार्यरत असून प्रलंबित निवडणुकांसाठी २९ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष नाईक यांनी रायगडमधील सर्व तालुक्यांत दौरे करून संघटनेचे काम तळागाळापर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षनिरपेक्ष समाजसेवा हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच राज्यातील १२ जिल्हा परिषद अध्यक्षांची बैठक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदस्यांचे अधिकार, मानधन व विकास निधी वाढवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
दरम्यान, एका जिल्हा परिषदेत वजन काटा खरेदीत गैरप्रकार उघडकीस येताच टेंडर रद्द करण्यात आले असून अशा प्रकारांमुळे सक्षम व जागरूक सदस्यांची गरज अधोरेखित झाली आहे.