अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे नागाव. समुद्रकिनारा, पर्यटन व्यवसाय आणि स्थानिकांच्या आदरातिथ्यामुळे नागावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणारे डॅशिंग माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. निखिल नंदकुमार मयेकर हे नाव नागावकरांसाठी विश्वासाचे प्रतीक बनले आहे. त्यांच्यासोबतच सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या सौ. हर्षदा निखिल मयेकर या देखील नागावच्या जनतेसाठी “ब्रँड” म्हणून ओळखल्या जात आहेत.
गावातील नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणे, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांची सतत पाहणी करून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणे, तसेच प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे, ही त्यांची कार्यशैली नागावकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी ठरली आहे.
सौ. हर्षदा मयेकर या महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आधारवड ठरत असून सामाजिक बांधिलकी जपत त्या गावातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, लोकांप्रती असलेली आपुलकी आणि विकासाची तळमळ यामुळे नागावमध्ये त्यांना “नागावचे आयडॉल” म्हणून संबोधले जाते.
नागावच्या विकासासाठी निखिल दादा आणि हर्षदा वहिनी यांनी उभारलेले कार्य हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून सामाजिक विश्वासाचे नाते निर्माण करणारे आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांमध्ये आज एकच चर्चा ऐकायला मिळते — “BRAND is BRAND… आणि नागावमध्ये तो ब्रँड म्हणजे मयेकर परिवार!”





