
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या बंदोबस्तादरम्यान उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड जवानांचा सन्मान करण्यात आला.
सागरी सुरक्षा बंदोबस्तासाठी कर्तव्यावर तैनात असताना दक्षता, तत्परता आणि जबाबदारीने कर्तव्य बजावत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रायगडच्या आँचल दलाल यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अभिनंदनपूर्वक गौरव करण्यात आला.
यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे, पोलीस हवालदार वरसोलकर, पोलीस हवालदार देशमुख तसेच होमगार्ड क्रमांक ४६३० भालचंद्र पाटील आणि होमगार्ड क्रमांक ५०४४ अनिल राठोड यांना उत्कृष्ट कर्तव्याबद्दल प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणे, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने दक्ष राहणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून भविष्यातही अधिक जोमाने कर्तव्य बजावण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या सन्मानाबद्दल अलिबाग पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड जवानांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





