आदर्श पतसंस्थेची पाली – सुधागड शाखा सुरू


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची पाली-सुधागड  येथील शाखा सुरू करण्यात आली आहे. आदर्श पतसंस्थेची ही २३ वी शाखा आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाली-सुधागड   शाखेचे उद्घाटन मंगळवारी ( दि. ८ )  ग. बा. वडेर हायस्कूल उपाध्यक्ष श्री. रवींद्र लिमये ,  रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन  सुरेश खैरे व संस्थेचे संस्थापक श्री सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील,  पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष  पराग विजय मेहता , रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन  सुरेश खैरे ,  ग. बा. वडेर हायस्कूल उपाध्यक्ष रवींद्र लिमये , पाली व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक  मेहता ,जनकल्याण पतसंस्था पालीचे  अध्यक्ष  चंद्रकांत (दादा) घोसाळकर, अष्टविनायक पतसंस्था नागोठणे अध्यक्ष  विलास भाई चौलकर ,  श्री आलाप अशोक मेहता पाली व्यापारी असोसिएशन अध्यक्ष, प्रतिष्ठित व्यापारी  इंदरशेठ परमार , जागा मालक  अशोकशेठ  ओसवाल , प्रतिष्ठित व्यापारी दीपकशेठ  ओसवाल ,  प्रवीणशेठ  कोठारी,   राजेंद्र (भाऊ) गांधी, पाली मधील उद्योजक श्री. सूरज शेळके ,  आदर्श नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील , संचालक  विलाप सरतांडेल , संचालक भगवान वेटकोळी , संचालक संजय राऊत ,  आदर्श पतसंस्थेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनाक्षी पाटील हे यावेळी उपस्थित होते .रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश  खैरे , जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्र्कांत घोसाळकर , ग. बा. वडेर हायस्कूल उपाध्यक्ष व रवींद्र लिमये , पाली व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील यांनी एकंदर संस्थेची वाटचाल , तसेच पाली येथे संस्थेची शाखा काढण्यामागची कारणे याबाबत आपले विचार व्यक्त केले व संपूर्ण पाली – सुधागड च्या नागरिकांना आदर्श पतसंस्थेच्या पाली शाखेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.