रायगड जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे जयेंद्र भगत यांच्याकडून अभिनंदन


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेत विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.   रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी श्री. मंगेश वाकडीकर यांची निवड झाल्याबद्दल भगत यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी श्री. मधुकर पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी श्री. अमित नाईक यांची निवड करण्यात आल्याबद्दल भगत यांनी त्यांचेही हार्दिक अभिनंदन केले. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि जिल्हा परिषदेत प्रभावी कामगिरी करण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी संतोष बईलमारे यांची नेमणूक झाल्याबद्दलही जयेंद्र भगत यांनी त्यांचे अभिनंदन केले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत विकासकामांना अधिक गती मिळेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.