अलिबाग (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी सालाबादप्रमाणे मल्याण व महाजने या गावांना भेट देत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व यावरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. “बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचा वारसा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मत राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान गावांमध्ये शांतता, अनुशासन आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक उपक्रम, अभिवादन सभा आणि प्रेरणादायी भाषणांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाभाऊ ठाकूर यांनी गावोगावी जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला, तसेच त्यांच्या विचारांवर चालण्याचा संदेश उपस्थितांना दिला.
Home ताज्या बातम्या अलिबागमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राजाभाऊ ठाकूर यांचे मल्याण-महाजने येथे अभिवादन






