अलिबाग (प्रतिनिधी): पेझारी नाक्याजवळ खारेपाट विभागीय शेतकरी कामगार पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. अद्ययावत कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
खारेपाट हा पक्षाचा आत्मा असून येथून संघटन अधिक मजबूत करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या वेळी सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील, मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, गौतम पाटील, प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्षातून उभा राहिलेला शेकाप पक्ष पुन्हा बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, गोरगरीबांच्या प्रश्नांवर काम करावे आणि शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांसोबत राहण्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.






