अलिबाग (प्रतिनिधी ): रायगड टॅक्स कन्सल्टंट असोसिएशन.(आरटीसीए) आणि अलिबागमधील टॅक्स कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्याने अलिबाग येथे टॅक्स कन्सल्टंटची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत टॅक्स कन्सल्टंट व्यवसायातील अडीअडचणी, त्यावरील उपाय योजना आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या सभेला अलिबागमधील टॅक्स कन्सल्टंट व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांचे ज्ञानवर्धन करण्यासाठी, तसेच आर्थिक उन्नती आणि उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सचिव श्री कौस्तुभ जोशी यांनी मांडला.
भविष्यात स्वराज्याच्या या राजधानीला ज्ञानाचा अभेद्य किल्ला बनवण्यात.असे प्रतिपादन अध्यक्ष जनार्दन तांडेल यांनी केले. आरटीसीए चे उद्दिष्ट आणि ध्येय सभासदांच्या गरजांशी सांगड घालणारे आहे असे संस्थेचे उपाध्यक्ष राजेश जगे यांनी सांगितले.
सभासद, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचे ज्ञानवर्धन करण्यासाठी संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यापुढील सर्व उपक्रम राबविताना, अलिबागकरांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात येईल, अशी ग्वाही संस्थेचे जिल्हा समन्वयक संजय राऊत यांनी दिली. उपस्थित सदस्य, आर्टिसीए या कार्यकारणीचे तसेच या कार्यक्रमास बैठक व्यवस्था करून दिल्याबद्दल आदर्श पतसंस्था अलिबाग यांचे आभार खजिनदार श्री किरण पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन करणे करिता अलिबाग तालुका समन्वयक सौ. स्वाती धर्माधिकारी, सौ श्वेता घरत, वैभव जोशी आणि श्री प्रणय नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.





