
अलिबाग (प्रतिनिधी) : पी.एन.पी. नाट्यगृह येथे स्वर्गीय खेबुडकर फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ५१ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीचा संगीतमय आढावा घेणारा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
या संगीतमय सोहळ्यास रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी त्यांनी खेबुडकर यांच्या समृद्ध गीतसंपदेचे कौतुक करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. श्री. प्रवीणदादा ठाकूर, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. कवितावाहिनी प्रवीणदादा ठाकूर, राहुलजी पिंपळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान खेबुडकर यांनी लिहिलेल्या गाजलेल्या गीतांची सादरीकरणे करण्यात आली, ज्यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक, कला रसिक आणि संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, खेबुडकर यांच्या समृद्ध कलाकृतींचा गौरव करणारा हा कार्यक्रम अलिबागमध्ये सांस्कृतिक पर्व ठरला.






