
अलिबाग(प्रतिनिधी): फेब्रुवारी 2026मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ता.8 जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्याचा 95.03 टक्के निकाल लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. जिल्ह्यात 96.44 टक्के मुली तर 93.70 टक्के पास झाली आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 475 विद्याथ्र्यानी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 217 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. यामधील 33 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा निकाल 95.03 टक्के लागला असून जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 97.62 टक्के पोलादपूर तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी 86.29 टक्के निकाल तळा तालुक्याचा लागला आहे. यावर्षी 16 हजार 510 मुली तर 16 हजार 959 मुले परीक्षेत पास झाली आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्याथ्र्यांनी एकच जल्लोष केला. मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. जिल्ह्यात 96.44 टक्के मुली तर 93.70 टक्के पास झाली आहेत.
सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तालुकानिहाय निकाल (टक्केमध्ये):
पनवेल 95.94, उरण 94.89, कर्जत 96.91, खालापूर 92.14, सुधागड 89.98, पेण 93.75, अलिबाग 95.35, मुरूड 94.59, रोहा 94.35, माणगाव 94.50, तळा 86.29, श्रीवर्धन 92.14, म्हसळा 93.06, महाड 96.96, पोलादपूर 97.62 टक्के.






