सुनेत्रा पवार यांचा रोहा येथे भव्य सत्कार; अमितदादा नाईक यांच्यासह सदस्यांची उपस्थिती


रोहा (प्रतिनिधी) : आज रोहा नगरपालिकेच्या देशमुख सभागृह येथे जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांच्या उपस्थितीत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. अमितदादा नाईक यांनी सुनेत्रा वहिनी पवार यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. कार्यक्रमात जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सभागृहात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विकासकामे, जनतेच्या अपेक्षा आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती अधिक वाढविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी घोषणाबाजी करत नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.