अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
यावेळी आमदार पत्नी सौ. मानसी दळवी या प्रमुख उपस्थित होत्या. त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच कन्या जुईली जुईकर-दळवी, माजी पंचायत समिती सदस्या, यांनीही कार्यक्रमात सहभाग घेत रुग्णांशी संवाद साधला. शिवसेना महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमादरम्यान रुग्णालय परिसरात सामाजिक बांधिलकीचे वातावरण पाहायला मिळाले. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याची परंपरा जपल्याबद्दल उपस्थितांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे कौतुक केले.
रुग्णांनीही फळवाटप उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी आमदार दळवी यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.






