प्राप्ती पृथ्वीराज पुरस्कृत’ ग्रामपंचायत किहीम संघाचा महिला रायगड कबड्डी लीगमध्ये मानाचा किताब


अलिबाग (प्रतिनिधी) : महिला रायगड कबड्डी लीग 2026 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ग्रामपंचायत किहीम संघाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा ‘प्राप्ती पृथ्वीराज पुरस्कृत आपल्या नावे केला. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण किहीम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेत संघातील खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ साकारत विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल ग्रामपंचायत किहीम संघातील सर्व गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच प्रसाद उर्फ(पिंट्या) गायकवाड यांनी संघाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, ग्रामीण भागातील महिलांनी क्रीडा क्षेत्रात केलेली प्रगती अभिमानास्पद असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
या विजयानंतर किहीम ग्रामस्थांनी संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, महिला खेळाडूंनी गावाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.