मेलोडी चॉकलेटमुळे शेअर बाजारात ‘पार्ले’चा गोंधळ; चुकीच्या कंपनीचे शेअर्स झाले तेजीत


कालचा दिवस हा ह्या मेलोडी चॉकलेटने खूप गाजवला. खूप म्हणजे खूप. त्याचे मीन्स काय काय विचारून हाका तुम्ही. तर मेलोडी चॉकलेट तुम्हाला माहिती आहेच पार्लेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या दौऱ्यावर गेले होते. आणि इटलीच्या दौऱ्यावर गेलेल्यासताना त्यांनी इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट दिला. आणि त्याचं व्हिडिओ दोन्हीकडेच गाजवले. म्हणजे इटलीने पण आणि इंडियाने पण आपला पोस्ट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काय झालं मेलोडी चॉकलेट आणि पार्ले हे एकदम गाजायला लागलं. आणि त्यामुळे शेअर बाजारात धुमाकूस सुरू झाला. पार्लेची कंपनी जी आहे त्या कंपनीचे शेअरचे भाव धाड धाड धाड धाड धाड वाढत गेला. म्हणजे किती वाढवत तो पहिल्याचं पाच टक्क्यांनी वाढला, हळूहळू तो सात टक्क्यांनी वाढला त्या शेअरचा भाव. आणि तुम्हाला गम्मत माहीत आहे का, यातच प्रचंड गोंधळ झाला. कारण ज्या शेअरचे भाव आपल्या सगळ्यांना वाढवत होते, मेलोडीचे उत्पादक म्हणून ज्या पार्लेचे वाढवत होते ना ती पार्ले कंपनी मेलोडीचं उत्पादनच करत नाही. पार्ले नावाची दोन कंपन्या आहेत. एक आहे पार्ले इंडस्ट्रीज. हे पार्ले इंडस्ट्रीज शेअर बाजारात आहेत आणि त्यामुळे ज्यांनी शेअरचे भाव वाढवले न त्य्या पार्ले इंडस्ट्रीजचे शेअरचे भाव वाढले. ही पार्ले इंडस्ट्रीज मेलोडीचं उत्पादनच करत नाही. किंवा बिस्किटाशी त्याचं दूरदूरून संबंध नाही. ही कंपनी नायंटीन एटीजमध्ये स्थापन झाली आणि त्याचं मेनली ते बिल्डर आहेत. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंध आहे आणि त्याचं पेपर रिसायक्लिंगशी संबंध आहे. मग हे मेलोडीचं उत्पादन कोण करतो? तर ह्या मेलोडी चॉकलेटचं उत्पादन हे पार्ले प्रोडक्ट्स नावाची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती करते. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चौहान नावाचे कुटुंबाचे आहे. आणि ही शेअर बाजारात नाही आहे. त्यामुळे त्यांचे शेअर विकत घेणं वगैरे हा तर प्रश्नच येत नाही. सगळ्यांनी जे शेअर घेतले ते चुकून पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर घेतलेत. पार्ले प्रोडक्ट्स ही चौहान यांची कंपनी आहे ती नाईटीन ट्वेंटी-नाईन साली स्थापन झाली. विलेपार्ल्याला त्यांचे एक अगदी छोटंसं दुकान होतं, जिथे ते स्वीट्स वगैरे विकायचे. आणि मग करत करत नाईंटीन थर्टी-नाईनमध्ये त्यांनी पार्लेची आणलं. आणि पार्लेची जेव्हापासून त्यांनी आणलं तेव्हापासून ही कंपनी अतिशय म्हणजे अतिशय लोकप्रिय झाली, अतिशय फेमस झाली. त्याच्यानंतर त्यांनी मोनॅक आणलं तुम्हाला माहीत आहे हायड अँड सी आणलं. अशा बऱ्याच बिस्किटाचे प्रकार जे आपण रोज खातो. क्रॅकॅल आणलं. ते सगळे जे आहे ते पार्ले कंपनी जे आहे पार्ले प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ती कंपनी करते. या कंपनीला विचारण्यात आलं की तुम्ही शेअर बाजारात का नाही उतरत तुम्ही एवढे मोठे कंपनी झालेत आता तर त्यांनी सांगितलं नाही आम्हाला प्रायव्हेट लिमिटेडच कंपनी राहायची आहे. आणि त्यामुळे ती अजून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही शेअर बाजारात आलेली नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी पार्ले-पार्ले करत ज्यांचे शेअर विकत घेतलेत ते इन्फ्रास्ट्रक्चर करणारे पार्लेची कंपनी आहे. असं झाला कालचा गोंधळ.