अलिबाग (प्रतिनिधी) : अशोक खरात याचे अनेक बडे राजकीय नेते तसेच मंत्रालयातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. या चर्चेमुळे संबंधित प्रकरणाकडे राज्यभरातील राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक गंभीर व महत्त्वपूर्ण टप्प्यात पोहोचली असून सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील घडामोडींना वेग आला असून अनेक स्तरांवर खळबळ उडाली आहे.
देशातील अनेक गाजलेल्या आणि संवेदनशील खटल्यांमध्ये प्रभावी युक्तिवाद करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अँड. उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात एन्ट्री झाल्याने संबंधितांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. विशेषतः राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील काही व्यक्तींमध्ये या खटल्याच्या पुढील सुनावणीबाबत उत्सुकता आणि चिंता दोन्ही निर्माण झाल्याची चर्चा आहे.
या प्रकरणातील पुढील तपास, न्यायालयीन सुनावणी आणि त्यातून समोर येणारे नवे खुलासे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काळात या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Home ताज्या बातम्या खरातचे अनेक बड्या उच्च पदस्थांशी संबंध?; प्रकरण अँड. उज्ज्वल निकम यांच्याकडे गेल्याने...





