अलिबाग (प्रतिनिधी): कुरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते, दिनेश कृष्णा पाटील यांच्या पत्नी, कुरुळ ग्रामपंचायतच्या माजी सदस्या दर्शना ( अलका ) पाटील यांचे अल्पशा आजाराने १३ जून रोजी दुःखद निधन झाले. यांच्यावर कुरुळ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या, मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाच्या, सर्व कार्यांत हिरीरिने सहभाग घेणार्या दर्शना पाटील निधनासमयी ५५ वर्षांच्या होत्या. 
दर्शना पाटील यांच्या अंत्ययात्रेला अनेक सामाजिक, राजकीय, बँकिंग क्षेत्रातील मंडळी, कुरुळ येथील ग्रामस्थ, मा. सरपंच, मा. सदस्य, नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या पश्च्यात पती दिनेश पाटील, मुलगा अँड. विनीत पाटील, मुलगी पर्णवी पाटील इतर कुटुंबिय आणि मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशविधी कार्य ( दहावे ) सोमवार २२ जून रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता कुरुळ तलाव येथे होणार आहेत.
निधनाची बातमी समजताच शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले, या प्रसंगी ग्रामपंचायत मा. सदस्य अवधूत पाटील, श्रीकांत पाटील, प्रदीप पाटील, अमोल नाईक, हर्ष ढवळे, रोहण पाटील, नितेश पाटील, अभिजीत घाडगे इतर सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






