देहुगाव येथील शंभर ते सव्वाशे वर्षापासून असलेल्या दफनभूमी विषयी आदिवासी पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली आमदार सुनील आण्णा शेळके यांची भेट….


पुणे (श्रावणी कामत): देहूगाव येथील शंभर ते सव्वाशे वर्षापासून आदिवासी पारधी समाजाची दफनभूमी आहे. त्या ठिकाणी काही नागरिकांकडून दपनभूमीवर झाडे लावून त्याची विटंबना करण्यात येत आहे. ही विटंबना होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कंपाउंड करण्यासाठी व त्या ठिकाणी असलेल्या दफनभूमीचे सातबारा आदिवासी पारधी समाज दफन भूमीच्या नावे करण्यासाठी आदिवासी पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने मावळचे कार्यसम्राट आमदार श्री.सुनील आण्णा शेळके यांची भेट घेऊन निवेदन दिले.तसेच ही दफनभूमी आदिवासी पारधी समाजाच्या नावे व दफनभूमीच्या आजूबाजूस कंपाउंड बांधण्यासाठी आदिवासी पारधी समाजाचे कार्यकर्ते अंकुश भोसले व माऊली उर्फ किसन भोसले हे त्या जागेविषयी गेली तीन-चार वर्षे पाठपुरावा करत होते. आमदार सुनील शेळके यांना तळेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेटले असता आमदार साहेबांनी त्वरित संबंधित विभागाला आदेश त्या ठिकाणी दिला यावेळी उपस्थित आदिवासी पारधी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आभार मानले व देहूरोड विभाग तसेच झेंडे मळा तेथील आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमधील समाजामध्ये समाधान झाले असल्याचे अंकुश भोसले यांनी माहिती दिली तसेच यावेळी अमित काळे,हर्षद चव्हाण,सचिन भोसले,शेकर चव्हाण,प्रीतम भोसले,शरद भोसले,राकेश चव्हाण,किशोर भोसले,छबू पवार,शुभम भोसले,सौरभ भोसले त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.