अलिबाग(प्रतिनिधी): श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676 वा संजीवन समाधी सोहळा अलिबाग येथे साजरा करण्यात आला.
नामदेव महाराजांच्या मूर्तीचे पूजन विलास डोळस व सौ.नीता डोळस या उभयतांच्या हस्ते झाले.संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाची महती पंजाब पर्यंत वाढवली. आयुष्याची बरीच वर्षे त्यांनी पंजाब मध्ये राहून वारकरी संप्रदायाची महती येथील लोकांना पटवून दिली. नामदेव महाराज यांनी जनजागृती केली. रचलेले अभंग
यातून त्यांची पांडुरंगा प्रति असलेली श्रद्धा,भक्ती याची प्रचिती येते.
अलिबाग मधील संत नामदेव शिंपी समाज मंडळ गेली अनेक वर्ष
नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करीत आहे. यावर्षी 11 ऑगस्ट रोजी हा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.या निमित्ताने अलिबाग शहर आणि परिसरात असलेल्या समाज बांधवांना एकत्र येण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धार्मिक विधी पार पडले. श्री संत नामदेव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. समाज मंडळाची वार्षीक सर्व साधारण शरद प्रभाकर हेऺंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
दुपारच्या सत्रात बालवाडी ते इ.दहावी, बारावी,पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कै.मनोरमा दत्तात्रय वाईकर,कै.मालती मधुकर डोळस, कै.काका मालोदे, कै.सुरेशचंद्र बगाडे या पुरस्कारांचे वितरण सर्वश्री. शशीकांत पोरे, विनायक शिंपी, नंदकुमार डोळस, किशोर राऊत, गजानन लखमदे,शरद हेंद्रे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले . कै.कमलाकांत गजानन राऊत पुरस्कार इयत्ता 8 वी व 9 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रीमती कुंदा कमलाकांत राऊत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त सौ.नीता डोळस यांना सेक्रेटरी सौ.सूचीता ढवळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष भवेष लिमकर,सौ.नीता डोळस, सर्वश्री शशिकांत पोरे, विनायक शिंपी, नंदकुमार डोळस, सचिन ढवळे, जगदिश राऊत,जीवन मुद्राळे यांनी आपले विचार मांडले. कार्यकारिणी सदस्य सर्वश्री अजित माळवदे,नील राऊत, मितेश पिंपळकर, भारत मुद्राळे, प्रभा गंधारे उपस्थित होते. खजिनदार किशोर राऊत यांनी जमा खर्च सादर केला तसेच समाज मंदिर बांधकामासाठी देणगी द्यावी असे आवाहन केले.सेक्रेटरी सौ.सूचिता ढवळे यांनी उपस्थित ज्ञाती बंधू भगिनींचे आभार मानले.








