अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबागमधील सुप्रसिद्ध मोबाईल विक्रेते ओलाईनओ तरंग मोबाईल यांच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा रक्त केंद्र, अलिबाग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिक, ग्राहक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ६१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद ओलाईनओ तरंग मोबाईलच्या सामाजिक बांधिलकीचे आणि नागरिकांच्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक ठरला.
तरंग मोबाईलचे मालक संदिप गावडे यांचे वडील कै. गजानन नारायण गावडे यांचे नागपंचमीच्या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे दिवसकार्य नुकतेच पार पडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या तयारीत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. मात्र, वडिलांना निधनापूर्वी रक्ताची गरज भासल्याने त्यांच्या स्मृती जागवताना शिबिरावेळी संदिप गावडे भावुक झाले.
आपल्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आनंद केवळ व्यावसायिक उपक्रमांपुरता मर्यादित न ठेवता “समाजासाठी काहीतरी देण्याची भावना” या उद्देशाने ओलाईनओ तरंग मोबाईलतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
यावेळी ओलाईनओ तरंग मोबाईलच्या वतीने सर्व रक्तदाते, रायगड जिल्हा रक्त केंद्राचे डॉक्टर गोसावी सर व कर्मचारी, तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दरवर्षी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कच्छी युवक संघाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
२५ वर्षांचा प्रवास ही आमच्यासाठी केवळ व्यावसायिक वाटचाल नसून अलिबागच्या नागरिकांनी दिलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. वडिलांच्या निधनानंतर अत्यंत भावनिक परिस्थितीत अवघ्या दोन दिवसां









