खोपोली (दत्तात्रय शेडगे): हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनंता हिरवे यांना बी दि चेंज या फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, हा पुरस्कार सोहळा शिर्डी येथे आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले
जिल्हाध्यक्ष अनंता हिरवे यांनी रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून समाजसाठी मोलाचे काम करत आहेत त्यांच्या कार्याची दखल या संस्थेने घेऊन त्यांना हा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यांचा सन्मान केला.
समाजसेवक अनंता हिरवे यांचा 15 जुलै 1977 रोजी खालापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गारमाळ (वावोशी) येथे झाला त्यावेळी त्यांची घरची परिस्थिती गरिबीची होती, त्यांनी गरीब परिस्थितीतुन शिक्षण घेत शिक्षण पूर्ण केले, त्यांना समाजसेवेची आवड पहिल्यापासून असल्याने त्यांनी आपला समाज एकत्र समाजाचा विकास व्हावा यासाठी आणि समाज एकसंघ रहावा यासाठी समाज बांधवांना एकत्र करून पंचवीस वर्षांपूर्वी रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेची स्थापना करून समाजाला हक्काची संघटना उभी करून दिली, या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाज बांधवावर होणाऱ्या अन्याय अत्याचार याला वाचा फोडून त्यांना देण्याचा ते प्रामाणिक प्रयन्त करीत आहेत तर समाजातील गोर गरीब मुलले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात, जेणेकरून आपल्या समजातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात शिक्षणाची क्रांती घडावी यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात,
ते समाज कार्य करत असताना त्यांना जीवनात अनेक चढउतार आले, त्यांच्यावर अनेकांनी बिनबुडाचे आरोप केले, मात्र अश्या परिस्थिती अनंता हिरवे यांनी आपली समाजसेवा चालू ठेवली, त्यांनी त्यांच्या कामातूम विरोधकांना उत्तर दिले त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले असून या माध्यमातून त्यांनी समाजासाठी अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले आहेत,
ते समाजकार्य करत असताना राजकारनातही त्यांचे चांगले वर्चस्व आहे ते शिवसेना शिंदे गटाचे गारमाळ शाखाप्रमुख असून आमदार महेंद्र थोरवे यांचे ते विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी आहेत
त्यांच्या या कार्याची दखल घेत बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने अंनता हिरवे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार शिर्डी येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला
त्यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार मिळाल्याने धनगर समाजात मानाचा तुरा मिळवला असून धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहेत
या पुरस्कारामुळे त्यांचे विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*************
मला मिळालेला महाराष्ट्र रत्न पुरस्कार हा माझा एकट्याच्या गौरव नसून हा गुणगौरव संपूर्ण समाजाचा आहे, माझ्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांमुळे हे शक्य झाले, या पुरस्कारामुळे मला यापुढेही अजून चांगले काम करायला ऊर्जा मिळेल
–अनंता हिरवे
जिल्हाध्यक्ष – रायगड जिल्हा धनगर समाज









