‘जिवलग मित्र गमावल्याचे दुःख’ व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली
रायगड (प्रतिनिधी): ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नाना पाटेकर यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत तटकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला हेलावून टाकणारी असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगी कायम सोबत उभे राहणारे, चांगल्या कामाचे कौतुक करून पाठीवर थाप देणारे आणि एखादी चूक झाल्यास ती हक्काने व स्पष्टपणे दाखवून देणारे नाना पाटेकर हे आपले जिवलग मित्र होते, अशा भावना तटकरे यांनी व्यक्त केल्या.
नाना पाटेकर हे केवळ आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय असलेले अभिनेते नव्हते, तर स्पष्टवक्तेपणा, संवेदनशीलता आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी कायम स्मरणात राहतील, असेही तटकरे यांनी नमूद केले.
“माझे मित्र, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला हेलावणारी आहे. सुख-दुःखाच्या क्षणी सोबत असलेले, चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप मारणारे आणि हक्काने चुका स्पष्टपणे दाखवून देणारे, ते माझे जिवलग मित्र होते,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.









