रायगडात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम जिल्ह्यातील 6 लाख 65 हजार 190 बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन


अलिबाग(प्रतिनिधी): जिल्ह्यातील बालके व विद्याथ्र्यांचे आरोग्य सुधारावे, त्यांची शारीरिक वाढ व पोषणस्थिती चांगली राहावी आणि जंतसंसर्गामुळे उद्भवणा-या आरोग्यविषयक समस्या कमी व्हाव्यात, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी (ता.27) राष्ट्रीय जंतनाशक दिन, तर 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 6 लाख 65 हजार 190 बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.23) बैठक घेण्यात आली.
बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दयानंद सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण शिंदे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. जयेश गोसावी, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डाॅ. प्राची नेहुलकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनी जंतनाशक गोळ्या घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांना व विद्याथ्र्यांना मॉप-अप दिनी गोळ्या देण्यात येतील. या मोहिमंेतर्गत अंगणवाडी, शाळा, शाळाबाह्य अशा 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व बालके व किशोरवयीन मुला-मुलींचा समावेश करण्यात येणार आहे.
या मोहिमेत अल्बेंडाझोल या जंतनाशक औषधाचा वापर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्या सहकार्याने लाभाथ्र्यांना औषध देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जंतसंसर्ग टाळण्यासाठी हात धुण्याचे प्रात्यक्षिक प्रत्येक अंगणवाडी, शाळांमध्ये दाखविण्यात यावे. तसेच मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाने समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील सर्व पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी बैठकीत करण्यात आले.

जंतसंसर्गामुळे बालकांच्या पोषणावर, शारीरिक वाढीवर आणि एकाग्रतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा लाभ मिळेल याची खात्री करावी, असे आवाहन राजिप आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

औषधाची मात्रा व देण्याची पद्धत:
 1 ते 2 वर्षे वयोगट: अर्धी गोळी (200 मि.ग्रॅ.)पावडर करून पाण्यात विरघळवून देण्यात येईल.
 2 ते 3 वर्षे वयोगट: 1 गोळी (400 मि.ग्रॅ.) पावडर करून पाण्यात विरघळवून देण्यात येईल.
 3 ते 19 वर्षे वयोगट: 1 गोळी (400 मि.ग्रॅ.) दाताने चावून खाण्यासाठी देण्यात येईल.