रायगड (प्रतिनिधी):रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचे गंभीर परिणाम लक्षात घेता, अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयांना दि. १९ जून २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हा निर्णय जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी घेतला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही भागांत मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून दरडी कोसळण्याची शक्यता व वाढलेले पाणीपातळीचे संकट लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पालक व विद्यार्थ्यांनी अधिकृत सूत्रांमार्फत पुढील सूचना पाहत राहाव्यात, असे प्रशासनाने सांगितले आहे.









