पेण (प्रशांत पोतदार) : जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते सहकाऱ्यांसह अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितलं की आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात छोटमशेठ यांनी निवडून येण्यासाठी मोठी ताकद लावली होती ही ताकद आता शिवसेनेला मिळाली आहे.
यामुळे छोटमशेठ व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाला याचा मोठा फायदा होऊन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या समक्ष त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला.
यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला असून, भगवा पुन्हा एकदा रायगडमध्ये संपूर्ण ताकदीने फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
या वेळी शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.