नवीन वाघविरा अंगणवाडी येथे चिमुकल्यांनी केला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


अलिबाग (प्रतीनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना अलिबाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या चिखली विभागातील नवीन वाघविरा अंगणवाडीमध्ये पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या लाभार्थींनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी या चिमुकल्यांनी योगा केल्यानंतर जंकफूड खाऊ नका. फळं भाज्या खा आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवा असा मोलाचा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला. यावेळी अंगणवाडी सेविका जीविता पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करीत असताना आपल्या दैनंदिन जीवनात योग साधनेचे महत्त्व विशद करून केवळ एक दिवस योगा करून चालणार नाही तर आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करून दैनंदिन आहारात देखील फळभाज्या, पालेभाज्या पौष्टिक आहार असणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात स्पष्ट केले. सदरील कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प अधिकारी शर्मिला पाटील तसेच सर्व पर्यवेक्षिका यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका जीविता पाटील मदतनीस सुचिता पाटील, पालकवर्ग सोनाली पाटील, प्रणाली पाटील, रंजना पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.