अलिबाग (प्रतिनिध):छायाचित्रकारांना नवनवीन, आद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावा, छायाचित्रकारांना एका उंचीवर नेण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन शी सलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि फोटोग्राफी क्षेत्रात जगात अग्रेसर अशा निकॉन कपंनीच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील वेव्हज हॉटेल च्या सभागृहात निकॉन ने नवीनच फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंग साठी लॉन्च केलेल्या आद्ययावत अशा Nikon Z5|| या कॅमेराची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे यावेळी निकॉन चे रिजनल मॅनेजर नीरज भाकरे यावेळी या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित होते. त्याचबरोबर रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, निकॉन चे एरिया सेल्स मॅनेजर मंजुनाथ गौडा, टेक्निकल प्रमुख राजू मौर्य, रायगड सेल्स प्रमुख हरीश, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, सल्लागार सचिन आसराणी, जितू शिगवण, गणेश जाधव, अमर मढवी, मच्छिन्द्र दवंडे, निलेश दुदम यांच्यासह अलिबाग मधील 40 फोटोग्राफर उपस्थित होते.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन ने या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले होते. Nikon Z5|| कॅमेरात लॉग मध्ये व्हिडीओ शूटिंग आणि फोटोग्राफी कशी करावी, कॅमेराचे फिचर्स या संदर्भात निकॉन च्या राजू मौर्य यांनी शिबिरात साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.









