अलिबाग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन (17 सप्टेंबर 2025) पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर 2025) पर्यंत हा पंधरवाडा राबवला जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत तीन टप्प्यांत कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना क्रमांक देणे, नोंदी करणे आणि मोजणी करणे यावर भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ योजनेसाठी उपलब्ध सरकारी जमीन कब्जेहक्काने वाटप करणे, अतिक्रमणे नियमित करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करणे याची अंमलबजावणी होईल. तिसऱ्या टप्प्यात स्थानिक गरजेनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार योजना तयार कराव्यात.
या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असून राज्यभर या मोहिमेची प्रसिद्धी करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आढावा घेऊन अहवाल राज्य शासनास सादर केला जाईल.
ही मोहिम राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समर्पित भावनेने राबवली जाणार असून प्रशासनाने यशस्वीतेसाठी पराकाष्ठा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम आणि जबाबदार प्रशासन निर्माण करण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
यासंदर्भात बुधवारी (10 सप्टेंबर) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची व्हिडीओ काॅन्फरन्स झाली. यासाठी अलिबाग उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण, अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील, निवासी नायब तहसिलदार संदिप जाधव, अलिबाग उपअधिक्षक भूमी अभिलेख भोलाशंकर कोकणे, अलिबागचे गटविकास अधिकारी दाजीबा दाईंगडे तसेच सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते.