सुधाकर खांडविलकर यांचे  निधन


अलिबाग (प्रतिनिधी): सुधाकर बाळकृष्ण खांडविलकर यांचे रविवार दिनांक १९ ऑक्टोंबर २५ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळमुळे शिवाजी पार्क येथे राहत्या घरी निधन झाले. सुधाकर खांडविलकर हे मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होते.सेवा निवृत्ती नंतर सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते.त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे ते संपूर्ण माहीम दादर परिसरामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता.

तसेच अलिबाग तालुक्यातील शेखाचे गाव येथील ते ग्रामस्थ होते. तेथेही त्यांचा जनसंपर्क असल्यामुळे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून तेअलिबाग तालुक्यात ओळखले जात होते.
सुधाकर खांडवीकर हे दादर परिसरातील शिवाजी पार्क शिवसेना भवन समोर राहत होते. दिनांक १९ ऑक्टोंबर २५ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळामुळे शिवाजी पार्क येथील राहत्या घरी निधन झाले . त्यांच्यावर शिवाजी पार्क दादर येथील वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात तीन मुले कौशिक, लक्ष्मीकांत हरेश्वर, सुना, नातवंडे पतवंडे असा खूप मोठा परिवार आहे.त्यांचे उत्तरकार्य (बारावा -तेरावा)३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता पितृ स्तुती चौथा मजला शिवाजी पार्क माहीम मुंबई येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे.