सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
सोगाव (अब्दुल सोगावकर) : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील कु. कृतिक संतोष बांद्रे व कु. नेहा पांडुरंग बांद्रे यांनी पिल्लई कॉलेज रसायनी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत दोघांनीही प्रथम क्रमांक पटकावला आहे, याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिल्लई कॉलेज रसायनी येथे २४ ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील स. म. वडके विद्यालयातील विद्यार्थी कु. कृतिक संतोष बांद्रे याने ५ हजार मीटर चालणे स्पर्धेत भाग घेत प्रथम क्रमांक पटकावला तर व कु. नेहा पांडुरंग बांद्रे हिने भाला फेक स्पर्धेत भाग घेत प्रथम क्रमांक पटकावला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत दोघांनी सहभाग घेऊन आपल्या विद्यालयाचे व मुनवली गावाचे नाव उज्वळ केल्याबद्दल मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सानिका घाडी व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी तसेच सचिन घाडी मित्रमंडळ मुनवली चे सर्व कार्यकर्ते यांनी बांद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.









