अलिबाग(प्रतिनिधी): “झेप फाउंडेशन” आणि “आय. ई. एस. पी.” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एव्हिएशन करिअर ऑपर्च्युनिटी या विषयावरील करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा यशस्वी समारोप झाला. जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप दक्षिण रायगड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील, सदस्य रायगड जिल्हा परिषदआय.ई.एस.पी. डायरेक्टर ग्रीरी खंन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमात विमानतळ हॉटेल व्यवस्थापन, केबिन क्रू, लॉजिस्टिक्स, ग्राऊंड स्टाफ, कुरिअर आणि क्रूझ व्यवस्थापन यासारख्या विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
मार्गदर्शक म्हणून मंझूर पाटील, श्रेयस खलटकर, दिव्यानी मोहिते, तन्मय धुळे, मानसी बंधेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध दिशा समजावून सांगितल्या.
कार्यक्रमाला स्थानिक तरुण तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.









