नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ जिल्ह्यात एकूण ७०.२६ टक्के मतदान


१ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

रायगड- अलिबाग,जिमाका दि.०२:-नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड या नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० पर्यंत ७०.२६ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार १ लाख १९ हजार ७८ तर स्त्री मतदार १ लाख १८ हजार ४२३ असे एकूण २ लाख ३७ हजार ५०३ मतदार होते.

१ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी मतदान केले. ८३ हजार ९८६ पुरुष मतदार, ८२ हजार ८७१ स्त्री मतदारांनी मतदान केले.

कर्जत येथे १० हजार ९५३ पुरुष, १० हजार ७२७ स्त्री मतदार असे एकूण २१ हजार ६८० मतदारांनी मतदान केले असून ७२.३७ टक्के मतदान झाले.

अलिबाग येथे ५ हजार ८५३ पुरुष, ५ हजार ६४५ स्त्री मतदार असे एकूण ११ हजार ४९८ मतदारांनी मतदान केले असून ७०.३१ टक्के मतदान झाले.

माथेरान येथे १ हजार ६२१ पुरुष, १ हजार ८४० स्त्री मतदार असे एकूण ३ हजार ४६१ मतदारांनी मतदान केले असून ८५.३५ टक्के मतदान झाले.

मुरुड जंजिरा येथे ४ हजार २६ पुरुष, ४ हजार ५०४ स्त्री मतदार असे एकूण ८ हजार ५३० मतदारांनी मतदान केले असून ७३.८९ टक्के मतदान झाले.

श्रीवर्धन येथे ४ हजार १८७ पुरुष, ४ हजार १९२ स्त्री मतदार असे एकूण ८ हजार ३७० मतदारांनी मतदान केले असून ६६.२३ टक्के मतदान झाले.

खोपोली येथे २१ हजार ६७० पुरुष,२० हजार ८६४ स्त्री मतदार असे एकूण ४२ हजार ५३५ मतदारांनी मतदान केले असून ६८.५२ टक्के मतदान झाले.

उरण येथे ९ हजार १३३ पुरुष, ८ हजार ६७२ स्त्री मतदार असे एकूण १७ हजार ८०५ मतदारांनी मतदान केले असून ६७.९२ टक्के मतदान झाले.

पेण येथे १२ हजार २१६ पुरुष, ११ हजार ६२९ स्त्री मतदार असे एकूण २३ हजार ८४५ मतदारांनी मतदान केले असून ७०.३९ टक्के मतदान झाले.

महाड येथे ८ हजार १६६ पुरुष, ८ हजार २६० स्त्री मतदार असे एकूण १६ हजार ४२६ मतदारांनी मतदान केले असून ७१.०३ टक्के मतदान झाले.

रोहा येथे ६ हजार १७० पुरुष, ६ हजार ५३८ स्त्री मतदार असे एकूण १२ हजार ७०८ मतदारांनी मतदान केले असून ७१.९२ टक्के मतदान झाले.