वाडगांव ग्रामपंचायतीत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त 5 टक्के दिव्यांग निधीचे वाटप


अलिबाग (प्रतिनिधी): ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव येथे 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व पात्र दिव्यांग बांधवांना 5 टक्के दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा, योजना आणि सरकारी लाभांची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर स्थानिक स्तरावर उपाययोजना राबविण्याचा ग्रामपंचायतीतर्फे संकल्प व्यक्त करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. समाजातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी, सन्मान आणि स्वावलंबन मिळावे यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले. दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन देत समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधत वाडगांव ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग हितासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला.

प्रमुख उपस्थितीत डाॅक्टर वैभव भगत व डाॅक्टर रश्मी भगत सर्व लाभार्थ यांनी विषेश आभार जयेंद्र भगत यांचे मानले.