खोपोली (दत्तात्रेय शेंडगे): मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील शिळफाटा, यशवंतनगर परिसरात आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटून पिकअप व कारला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या घटनेत तिन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्रमांक MH 47 Y 2645) हा पुण्याकडून माल घेऊन खोपोलीकडे येत होता. यशवंतनगर परिसरात पोहोचताच चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे असलेल्या पिकअप (MH 12 QW 1265) तसेच सेलेरिओ कारला (MH 14 Y 0927) पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस व हेल्प फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.









