स्व. लक्ष्मणशेठ साबळे यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त समाजोपयोगी आरोग्य उपक्रम


खोपोली(दिनकर भुजबळ): खोपोली येथे स्वर्गीय लक्ष्मणशेठ मल्हारी साबळे यांच्या २४ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर तसेच कर्करोग पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा उपक्रम खोपोलीचे विद्यमान उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे, अध्यक्ष – Vikram Sable Foundation यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक : शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
स्थळ : महाराजा मंगल कार्यालय
या शिबिरामध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोगाची पूर्व तपासणी, पॅप स्मिअर/HPV तपासणी तसेच ४० वर्षांवरील महिलांसाठी मॅमोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक तपासणीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्वर्गीय लक्ष्मणशेठ साबळे यांच्या समाजसेवेच्या मूल्यांना पुढे नेत, हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.