मनसैनिकाने दिलेला GR देखील तात्काळ फाडून कचरापेटीत टाकून दिला
खालापूर(प्रतिनिधी): खालापूर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार अभय चव्हाण आणि निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दरम्यान, शासनाने दिलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर रहावेत या आशयाचा GR मनसे तालुका अध्यक्ष अॅंड. अतुल हाडप यांनी तहसीलदारांना दाखवून वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन केले मात्र GR तहसीलदारांनी फाडून थेट कचरा पेटीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप मनसेने केला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.









