अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंगेश रामचंद्र वाकडीकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी वाकडीकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी सांगितले की, मंगेश वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला नवे गतीमान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी आस्वाद पाटील आणि चित्राताई पाटील यांनीही मंगेश वाकडीकर यांचे अभिनंदन केले. त्यांनी वाकडीकर यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे रायगड जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल आणि जिल्हा परिषद सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी झालेल्या या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून वाकडीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






