अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील नामांकित ‘श्री कोल्ड्रींक्स’ या पेय व्यवसायाला तब्बल ४८ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली असून, स्थानिकांसह पर्यटकांमध्येही या ठिकाणाची खास ओळख निर्माण झाली आहे. पारंपरिक चवींचा वारसा जपत आधुनिक पेयांची जोड देत ‘श्री कोल्ड्रींक्स’ने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
या ठिकाणी मिळणारे ताजे ‘यस (ताक)’ हे उष्णतेत शरीराला दिलासा देणारे पेय म्हणून विशेष लोकप्रिय आहे. तसेच, नव्या पिढीला आकर्षित करणारे ‘मोजिटो’ही ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘स्वीट लख्यी’ सारखे खास पारंपरिक पेय चवीचा वेगळा अनुभव देतात.
याशिवाय, पुदिना सोडा, कोकम सोडा, आवळा सोडा आणि लिंबू सोडा यांसारखी विविध फ्लेवर्सची पेये ग्राहकांना ताजेतवाने करतात. नैसर्गिक घटकांचा वापर आणि दर्जेदार सेवा यामुळे या पेयांना वेगळीच मागणी आहे.
चार दशकांहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास संपादन करत ‘श्री कोल्ड्रींक्स’ हे अलिबागमधील एक विश्वासार्ह नाव ठरले असून, स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे. भविष्यातही ही परंपरा टिकवत अधिक चवदार अनुभव देण्याचा निर्धार संचालकांनी व्यक्त केला आहे.
Home ताज्या बातम्या अलिबागमधील ‘श्री कोल्ड्रींक्स’ला ४८ वर्षांची परंपरा; पारंपरिक पेयांपासून आधुनिक मोजिटोपर्यंत चवदार प्रवास





