अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या वतीने दिनांक १५ जुलै हा कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ( बुवा) साळवी यांचा जन्म दिवस ” कबड्डी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
या कबड्डी दिनी रायगडच्या दोन अनुक्रमे अभिजित राणे, क्रीडा कार्यकर्ते आवास ता अलिबाग यांना “कृतज्ञता” पुरस्कार तसेच पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर या दोन शिलेदारांना राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे पुरस्कार जाहीर झाले असून दिनांक १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या कबड्डी दिन कार्यक्रमात दोघांना अमृत कलश देऊन गौरवण्यात येणार असून या दोघांवरही रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे






