महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण


नवी मुंबई, दि. १३ (विमाका) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०५ वाजता महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते कोंकण भवन इमारतीच्या प्रांगणात करण्यात येणार आहे.

या राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास कोकण विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. उपस्थितांनी राष्ट्रीय अथवा समारंभीय पोषाखात सहभागी व्हावे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वी किमान २० मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

समारंभाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असून, उपस्थितांनी कोणतीही बॅग अथवा अनावश्यक साहित्य सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.