तळोजा एमआयडीसीतील खाद्य कंपन्यांना बेकायदेशीर नोटिसा ? 


नगरसेवक तथा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांची दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पनवेल (प्रतिनिधी): तळोजा एमआयडीसी परिसरातील सोनिया फिशरीज, संचिता मरीन, डेन्सन फूड्स, विस्टा फूड्ससह अनेक खाद्य कंपन्यांना प्रभाग अधिकाऱ्यांकडून चुकीच्या व बेकायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप नगरसेवक तथा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली.

यावेळी शिवसेनेचे पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, नगरसेवक तथा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, एकनाथ म्हात्रे,  उपमहानगरप्रमुख सचिन मोरे,  शहरप्रमुख राहुल कदम, शहरसंघटक अभिजित साखरे, युवा सेनेचे कपिल कुरघोडे, जगदीश ठाकूर, आशिष हवलदार, जय कुष्टे, धिरज निंबाळकर आदी उपस्थित होते.