लोणावळा (श्रावणी कामत):दि 30/8/2026 रोजी चंद्रलोक हॉटेल येथे भव्य दहीहंडी महोत्सव 2026 संदर्भात संकल्प युवा प्रतिष्ठान यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले दर वर्षी संकल्प युवा प्रतिष्ठान समाजासाठी वेगवेगळे प्रकल्प व योजना वर काम करतात विनोद होगळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले जसे सर्व स्पर्धेकांसाठी व प्रेक्षकांसाठी भोजन व पाणी व्यवस्था, विजेता संघास भव्य 6 फुटी ढाल व रोख पारितोषिक, दहीहंडी पूजनाचा मान शिक्षक वृंद व गुरुजन वर्ग विजेत्या संघतील बालगोपाळास सायकल व त्यांच्या आई वडिलांना पैठणी व पोशाख, मराठी दिग्गज कलावंतांची सदिच्छा भेट, स्पर्धक व प्रेक्षक यांच्यातून एकच लकी ड्रॉ कुपन काढण्यात येईल विजेत्यास टू व्हिलर भेट देण्यात येईल.. मंजुश्री वाघ यांनी प्रत्येक संघातील बाळगोपाळास बासुरी, आकर्षक मेडल, ट्रॉफी व प्रशस्ती पत्र देण्यात येईल. महेश केदारी यांनी व्यसनमुक्ती घोषणा सांगितले 1) सशक्त भारताचा एकच नारा, व्यसनाला देऊ नका ठारा. 2)निसर्गाने बहाल केलेलं जीवन अमूल्य आहे, व्यसनाच्या नादात त्याची राख करू नका. तसेच adv सोनवळे यांनी व्यसनमुक्ती साठी व समाजाच्या नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करत आहे..
संकल्प युवा प्रतिष्ठान यांनी या वेळी सलग 3 वर्षे दहीहंडी फोडणाऱ्यांना संघास 3,33,333/-रोख चेक द्वारे पारितोषिक देण्यात येईल.या वेळी संकल्प युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच 16 दहीहंडी संघाच्या कार्यकर्ते उपस्थित होते
तसेच मंडळाने पोलीस प्रशासनास विनंती केली आहे कि पथक हौसने येतात त्यांना वेळ द्यावा









