अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व महिला व बालकल्याण सभापती सौ. रसिकाताई केणी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी विविध मान्यवरांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. याच अनुषंगाने त्यांनी राजाभाई केणी व सौ. रसिकाताई केणी यांच्या घरी भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले आणि आरती केली.
यावेळी केणी कुटुंबीयांकडून पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे स्वागत करण्यात आले. गणरायाच्या चरणी रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली.
या भेटीप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि केणी कुटुंबीय उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.








