अलिबाग (प्रतिनिधी): माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘एक दिवा आशीर्वादाचा’ हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात भाजप महिला जिल्हाध्यक्ष डॉ. चित्रा पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होत आशीर्वादाचा दीप प्रज्वलित केला.
राष्ट्रसेवेच्या अखंड प्रवासाला समर्पित असलेल्या या दीपज्योतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी निरंतर ऊर्जा लाभावी, अशी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील, सावाई पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून राष्ट्रसेवेप्रती असलेली बांधिलकी आणि शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनात आणि तो यशस्वी करण्यासाठी भाजप महिला जिल्हाध्यक्ष डॉ. चित्रा पाटील यांनी विशेष सहभाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.









