विक्रेत्यांसाठी सुविधायुक्त जागा, नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित बाजारपेठ


प्रकल्पाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर : प्रशांत नाईक

अलिबाग  (प्रतिनिधी): विक्रेत्यांना चांगली, प्रशस्त आणि सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देतानाच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व व्यवस्थित बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने बाजारपेठ विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला अधिक चांगले वातावरण मिळणार असून, नागरिकांनाही खरेदीसाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
बाजारपेठेतील मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि नियोजनबद्ध व्यवस्था यावर विशेष भर देण्यात येत आहे. विक्रेत्यांना व्यवसायासाठी योग्य जागा मिळाल्यास बाजारपेठेतील अनावश्यक गर्दी व असुविधा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात खरेदी करता येणार आहे.
या कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रकल्पाचे काम निर्धारित निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून त्याचा प्रत्यक्ष लाभ विक्रेते व नागरिकांना मिळवून देण्यावर भर असल्याचे वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक यांनी सांगितले.
“विक्रेत्यांना चांगली आणि सुविधायुक्त जागा मिळावी, तसेच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर आहे.”
— प्रशांत नाईक, सभापती, वीज व बांधकाम समिती