नानांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? मध्यरात्री छातीत दुखत असल्याचा मित्राला केला होता मेसेज


गोवा (प्रतिनिधी): ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नाना काल गोव्यातील त्यांच्या घरी होते. मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास त्यांनी एका मित्राला मेसेज करून आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. तसेच छातीच्या डाव्या बाजूला वेदना होत असल्याचेही त्यांनी या मेसेजमध्ये नमूद केले होते. मात्र रात्री उशिराची वेळ असल्याने मित्रांना हा मेसेज तत्काळ दिसला नाही.
पहाटे चारच्या सुमारास मित्राने नानांचा मेसेज पाहिल्यानंतर तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी नानांना श्वास घेण्यास मोठा त्रास होत होता आणि ते घामाने पूर्णपणे भिजलेले होते. दरम्यान, केअरटेकरने रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिकाही बोलावली होती. मात्र रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत नाना बेशुद्ध झाले होते.
नानांना वाचवण्यासाठी त्यांच्या घरीच तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तब्बल ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला. त्यानंतर कार्डियाक मसाज करूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पहाटे सुमारे ४ वाजून २० मिनिटांनी नानांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, नानांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. रुग्णालयातही डॉक्टरांनी सीपीआरसह त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केले.
नानांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने या प्रकरणी मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नानांच्या अचानक झालेल्या एक्झिटने चाहत्यांसह चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनावर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नसल्याचे चित्र आहे.