सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नील नाईक यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
अलिबाग (प्रतिनिधी): मैनुशेठ यांच्या वाड्याजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नील नाईक यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांतून मार्ग काढताना अपघाताचा धोका निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन स्वप्नील नाईक यांनी या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी पुढाकार घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नील नाईक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष काम पूर्णत्वास नेल्याने स्वप्नील नाईक यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.









